कन्नड – (प्रतिनिधी) – शहरातील सहलीवर गेलेल्या सानेगुरुजी माध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा अलिबाग येथील मुरुड जंजिरा रोड जवळील रायगड काशीद समुद्राच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दी. ९ जानेवारी रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अलिबाग येथे सहल थांबली असता विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही समुद्राच्या कडेला लाटांची मजा घेत असताना चार ते पाच विद्यार्थी खेळत होते. यात समुद्राची लाट परत जात असताना सानेगुरुजी माध्यमिक शाळेचा इयत्ता १० विचा विद्यार्थी प्रणव सजन कदम (रा कन्नड शहर) हा पाण्यात ओढल्या गेला यावेळी त्याला वाचविण्यासाठी रोहण संतोष बेडवाल ( रा ब्राम्हणी ता कन्नड) हा विद्याथी गेला असता त्याचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तेथील शिक्षकांनी दिली आहे. प्रणव कदम हा शाळेतील शिपाई सजन कदम यांचा मुलगा होता या घटनेची माहिती शहरात व शैक्षणिक क्षेत्रात वाऱ्यासारखी पसरली असून एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्यांची नावे-
प्रणव सजन कदम वय पंधरा वर्षे
रोहन बेडवाल वय पंधरा वर्षे
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे नेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे-
कृष्णा विजय पाटील वय पंधरा वर्षे
तुषार हरिभाऊ वाघ वय पंधरा वर्षे
रोहन दिलीप महाजन वय पंधरा वर्षे
सायली मनोज राठोड वय पंधरा वर्षे