सोलापूर,( दिनांक) : सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्रीनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सातलिंग शटगार सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गुरुवार ,दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मुंबई येथील विधिमंडळ दालनात राज्य अध्यक्ष श्री.अशोक बेलसरे सर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब, बनसोडे साहेब, भारत घोडके ,अंबादास गवळी, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या विधिमंडळ दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बोलताना श्री .सातलिंग शटगार म्हणाले की, “शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. विनाअनुदानित शाळेचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना ,मेडिकल बिल, अनुकंप भरती ,शालार्थ आयडीचे प्रश्न असे ज्वलंत प्रश्न आहेत. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, उपसंचालक, माननीय शिक्षण मंत्री ,यांच्या पर्यंत चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.”
राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले साहेब , प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती-ताई शिंदे , जिल्हाध्यक्ष धवल दादा मोहिते- पाटील यांच्याकडून श्री. सातलिंग शटगार यांची जिल्हा शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .श्री.सातलिंग शटगार हे अनेक सामाजिक संघटनेत कार्यरत आहेत. अ.नि.स मध्ये 12 वर्षे राज्यभर त्यांनी काम केले होते, गांधी फोरम ,महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान ,हुतात्मा प्रतिष्ठान अशा माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोलाचे आहे.त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.
या निवडीबद्दल देशाचे माजी गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी गृहमंत्री श्री. सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणितीताई शिंदे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवल दादा मोहिते- पाटील, संस्थेचे अध्यक्ष नागनाथ सुरवसे सर, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार धनाजी साठे, झपके सर, विश्वनाथ चाकोते, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन श्री. धर्मराज काडादी, पुरुषोत्तम बलदवा, सुदीप चाकोते, विजय रघोजी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे ,जिल्हा महिला अध्यक्ष शाहीन शेख ,शहर अध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष माने, जिल्हाध्यक्ष तानाजी माने, पुणे विभागीय अध्यक्ष श्रावण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष महेश सरवदे, राज्यविद्या सचिव जितेंद्र पवार , शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी,दत्तात्रय गाजरे, सतीश दरेकर, मन्मथ उकरंडे, रेवणसिद्ध रोडगीकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.