निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ज्या मतदार यादी भागात 1 हजार 500 किंवा अधिक मतदार असतील किंवा आगामी कालावधीत 1 हजार 500 मतदार पूर्ण होतील त्याअनुषंगाने मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 232, 248, 241 व 307 या मतदार केंद्रावरील मतदारांची संख्या 1 हजार 450 च्या वर असल्याने हे चार मतदान केंद्र विभागण्यात येवून मतदार यादी भागासाठी नवीन मतदान केंद्र पुनर्गठित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार, सातारा यांनी दिली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्या अध्यखतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवडणूक अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये 262- सातारा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या सुसुत्रिकरण्याचा आढावा संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आला.