नांदेड सामाजिक वनीकरण मार्फत मुदखेड तालुक्यातील दरेगाव वाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिकेचे काम चालू आहे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सामाजिक वनी करणे मनमानी करून त्याच त्याच व्यक्तीच्या नावाने बिल काढली आहेत याप्रकरणी वरिष्ठान पासून चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
दरेगाववाडी येथे २०१७ पासून रोपवाटिका सुरू केली असल्याचे सांगण्यात आले या रोपवाटिकेत केवळ चार ते पाच लोक काम करतात परंतु संबंधित रोजगार सेवक मात्र जवळपास २० लोकांचे मस्टर भरून खोटे मजूर दाखवून पैसे उचलून घेत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या होत्या परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी काही कारवाही केली नसल्याचे सांगण्यात आले.
सध्या मार्च महीना असल्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिकेचे खोटे मस्टर भरून पैसे उचलण्याची घाई गडबड रोजगार सेवक यांच्याकडून होत आहे.या रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे याची वरिष्ठापासून चौकशी करण्यात यावी संबंधितांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.