समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर अति वेगाने समृद्धी महामार्गावरून गाडी चालवणं शक्यतो टाळा महामार्गावर वेगवान प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात आणि त्यामुळे ऑटोमोबाईल तज्ञांनी प्रवासामध्ये टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. समृद्धी महामार्गाने वेगाने गाडी चालवताना टायरवर दाब देऊन टायर फुटून अपघात होऊ शकतो. असं सांगण्यात येते वाहनाच्या टायरमध्ये साधी हवा भरल्यावर नॉनस्टॉप गाडी चालवल्यास टायर मध्ये हवा प्रसरण पाहून टायर फुटण्याचा धोका असतो.त्यामुळे नायट्रोजन भरावा असा सल्ला देण्यात आलाय.
टायरची साईड बॉल ही चेक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय.गाडीला चांगल्या स्थितीतले टायर असावेत घासून गुळगुळीत झालेले टायर नकोत. टायर मध्ये साध्या हवे ऐवजी नायट्रोजन भरा. विल अलाइनमेंट करून समृद्धीवर प्रवास करा. समृद्धीवरून नॉन स्टॉप प्रवास करणे टाळा 100 ते 150 किलोमीटर मध्ये किमान दहा मिनिटांचा गाडीला ब्रेक द्या. वेगाशी स्पर्धा करूच नये.