सोलापूर : सोलापूरच्या बहुचर्चित श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या चिमणी पाडण्याला कारखान्याचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधून तीव्र असा विरोध करण्यात येत आहे. प्रशासनाने तो विरोध झुगारून यंदा कुठल्याही परिस्थितीत चिमणी पाडण्याची भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासनाने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणारे मार्ग हत्तुरे वस्ती पासून बंद केले आहेत.
दिनांक 13 जून ते 18 जून या सहा दिवस हत्तुरे वस्तीपासून पुढे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कोणालाही जाता येणार नाही. काही ठराविक वाहने वगळता इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बंद केलेला मार्ग आणि दिलेली पर्यायी व्यवस्था या आदेशात पहा