विद्यार्थी घडविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य लेबर युनियनय जिल्हा सोलापूर व APJ फॉऊडेशनच्या वतीने माहे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सी.टी.इ.टी) गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊन यश मिळवल्या बद्दल ब्रेनी बॅजर्स अकॅडमीचे प्राध्यापक तय्यब शेख व शुभम उपाध्ये सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्तीर्ण झालेले विदयार्थ्यांनी कु. उजमा मुस्ताक शेख व कु. उमामा मुस्ताक शेख यांचा ही सत्कार युनियनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी युनियनचे अध्यक्ष अशपाक शेख उपस्थित होते सदर कार्यक्रमच्या वेळी विदयाथी आपले मनोगत व्यक्त केले. ब्रेनी बॅजर्स अकॅडमीचे प्राध्यापक यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे सोप्या व मनोरंजन पध्दतीने अदयापन करून विदयार्थ्यांना यश मिळवून देण्या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक तय्यब शेख व त्यांचे सहकारी युनियनचे व पालकांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमसाठी अझहर मुलाणी, रॉयल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादीक नदाफ, खालीक मन्सूर अजीज शेख, महिबुब शेख, इम्तियाज शेख, मुजीब शेख, सलीम जमखंडी, मलिक रेहान शेख उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमची प्रस्थावना सौ. महेबुबबी मुस्ताक शेख (म.न.पा मुलींची क्र. ३. शाळा सोलापूर) यांनी केले तर कार्यक्रमचे सूत्र संचालन APJ संस्थापक अध्यक्ष इमान मंगलगिरी यांनी केले व मुस्ताक शेख यांनी आभार मानले संस्थेचे सचिव श्री. नौशाद शेख यांनी पुढील कार्यकिर्दीसाठी शुभेच्छा दिले.