सुरत चेन्नई महामार्गाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, असा आरोप करून या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे
केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत सुरत चेन्नई महामार्ग उभारणीसाठी राज्यातील नाशिक अहमदनगर सोलापूर या तीन जिल्ह्यांना जोडून हा मार्ग महामार्ग होत आहे. नाशिक जिल्ह्यातून सर्वसाधारण 988 हेक्टर जमीन ही या महामार्गात जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक सुरत हे अंतर केवळ 170 किलोमीटरच्या जवळपास येणार असून केवळ दोन तासांमध्ये सुरतला जाता येणार आहे. हे सर्व घडत असताना नाशिकमध्ये आडगाव येथे नाशिक दिंडोरी निफाड सिन्नर सुरगाणा पेठ या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वांनी एकत्रित होऊन लढण्याचा निर्णय घेतला असून सुरत चेन्नई महामार्गाला विरोध करण्यात येणार आहे, असे देखील घोषित करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...