सोनपेठ- परळी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येत असलेल्या कार व ऑटो रिक्षा ची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना सोमवार दि.१३ मार्च रोजी दुपारी दोन च्या सुमारास घडली. या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत.जखमींना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
सोनपेठहुन एक ऑटोरिक्षा डिघोळ कडे शालेय विद्यार्थी व नागरिक घेऊन जात असताना, परळी हुन सोनपेठ कडे येणाऱ्या चारचाकी कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. ऑटो क्रमांक. MH 44 A 2716 हा डीघोळ कडे जात होता याच सुमारास परळी येथून येणारी मारुती अल्टो कार क्रमांक MH 22 U 3498 यांची खपाट पिंपरी शिवारात समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रदीप करडभुजे (वय 45 ) पंकज महाजन (वय 43) संगीता महाजन (वय 35) चैतन्य महाजन (वय 10) कुणाल शिंदे (वय 16)लक्ष्मण हजारे (वय 35) ऋतुजा रांजणे (वय 16) शिवकन्या गिरे (वय 16) आर्यन करडभुजे (वय 10) आराध्या करडभुजे (वय 3 वर्ष) प्राची करडभुजे (वय 30 ) व आदित्य रत्नपारखे (वय 16 ) अशी जखमीची नावे असून जखमींना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले व काही जनांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, दिलिप निलपत्रेवाड ,विनोद कुलकर्णी, श्रीकृष्ण तिडके, यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.