अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा दया, तसेच भरघोस मानधन वाढ करा, कामासाठी लागणारे मोबाईल त्वरीत दया यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी सातत्याने संघर्ष करत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरघोस मानधन वाढीबाबतीत २६ जानेवारीला घोषणा करु असे जाहिर सांगीतले होते.
अद्याप अंगणवाडी कर्मचारी त्या प्रतिक्षेत आहेत. तरी महिला बालकल्याण मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सुमारे २ लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांची फसवणुक केली आहे. त्यांच्या व या शासनाच्या निषेर्धात सोमवारी अंगणवाडी सेविकांनी काळ्या साड्या घालून काळे झेंडे दाखवत जिल्हा परिषदेसमोर थाळी नाद आंदोलन केले.
दरम्यान सोलापूर जिल्हयातील सर्व अंगणवाडी कर्मचारी १०० टक्के संपात भागीदारी करणार आहेत. व तसेच २० फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद पुनम गेट येथे काळया रंगाच्या साड्या परिधान करुन शासनाच्या विरोधात तिव्र निदर्शने करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुर्यमणी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सरलाताई चाबुकस्वार यांनी दिली.