सोलापूर शहरात तब्बल 22 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार आणि सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. आषाढी वारीच्या निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात आली आणि मंगळवेढा मध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आणि अकलूज भागात चांगला पाऊस झाला त्यानंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले. आणि सुरुवातीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली पहिला पाऊस अंगावर पडतात शाळकरी मुलांनी नाचून आनंद व्यक्त केला.
त्यानंतर हळूहळू मुसळधार अशा पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सर्व शहर व्यापले. बऱ्याच दिवसानंतर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा तर नक्कीच सुखावला असणार परंतु सोलापूरकरांनाही तितकाच आनंद झाला. आता निश्चितच पेरण्यांना वेग येणार आहे.