सोलापुर सुरक्षिता आणि पुर्नबांधनी वित्त मालमत्ता आणि अंमलबजावणी सुरक्षा हीत कायदा २००२ सरफेसी कलम १४ नुसार तारण मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी सोलापुर येथील मे. मुख्यन्यायदंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात ई फाइलिंग द्वारे दाखल केलेल्या प्रकरणावर सोलापुर येथील मे. मुख्यन्यायदंडाधिकारी साहेब यांनी सुनावणीच्या पहील्याच दिवशी निकाल देऊन तप्तर न्यायदानाचा विक्रम केला आहे.
सोलापुर येथील विकास सहकारी बँक लि व विद्यानंद को ऑप बँक लि यांनी थकीत कर्जदारांची तारण मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सुरक्षिता आणि पुर्नबांधनी वित्त मालमत्ता आणि अंमलबजावणी सुरक्षा हीत कायदा २००२ चे कमल १४ नुसार सोलापुर येथील मे. मुख्यन्यायदंडाधिकारी श्री. विक्रमसिंह भंडारी साहेब यांचे कोर्टात दिनांक २५/०२/२०२३ चवथा शनिवार असलेल्या सुटीच्या दिवशी रोजी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले होते.
सदरचे सर्व सात अर्ज पडताळणी करून दिनांक २८/०२/२०२३ रोजी मे मुख्यन्यायदंडाधिकारी श्री. विक्रमसिंह भंडारी साहेब यांचे समोर सादर केले असता सदर अर्जाची पडताळणी करून त्याच दिवशी सदर सर्व अर्जावर सुनावणी घेऊन सदरचे सर्व सात अर्ज मंजुर करून तारण मालमत्ता न्यायालयीन कमिशनर मार्फत ताब्यात घेण्याचा आदेश पारित केला आहे. ई-प्रणालीव्दारे दाखल खटल्याच्या सुनावणीच्या पहील्याच दिवशी निकाल देण्याचा सोलापुर जिल्हा न्यायालयातील हा पहीलाच प्रसंग आहे.
सदर कामी पक्षकारांना व्यक्तीकरित्या न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता पडली नाही. ई प्रणालीद्वारे खटले न्यालयात दाखल केल्यामुळे लवकर न्याय मिळत असल्याची भावना बँकेद्वारे व्यक्त करण्यात आली. सदर दोन्ही बँकातर्फे दाखल सर्व सातही खटल्यात अॅड. श्रीकांत पुंडलिक सपार व अॅड. उमा शिरसी यानी काम पाहीले आहे.