बोरामणी हायवेवरून जाताना एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. संपूर्णपणे लोडेड असलेल्या या गाडीत आग लागल्याने मोठी हानीची शक्यता होती. याच रोडवरून इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधव जात होते. एरवी ब्रेकिंगची गडबड असताना बातमी आधी लोकांचा जीव महत्वाचा म्हणतं सोलापुरातील या पत्रकारांनी आग विझवण्यासाठी मेहनत घेतली.
मिळेल तिथून पाणी बॅरेल उचलून आणले, यंत्रणाना फोन करून कळवलं. योग्य वेळी मदत केल्याने आग आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. याप्रसंगी टीव्ही नाईनचे प्रतिनिधी सागर सुरवसे, विनोद हुमनाबादकर, एबीपी माझाचे अफताब शेख, साम टीव्हीचे विश्वभूषण लिमये, झी 24 तासचे अभिषेक आदेप्पा, तौसिफ शेख, विजय बाबर हे सर्व पत्रकार मदतीला होते.