बीफ एक्सपोर्ट कंपनी, बांधकाम साहित्य आणि भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे सोमर येत आहे. सोलापुरातील आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोड परिसरामध्ये हे छापे टाकण्यात आले असून या छाप्यांमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने हे छापे टाकल्याची माहिती मिळतीय. यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याची प्राथमिक माहिती असून भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून येत आहे तसेच हैद्राबाद रोड येथील कत्तलखाना चालवणाऱ्या एका कंपनीवर ही छापे टाकण्यात आले आहेतया कंपनीच्या मुंबई, कोल्हापूरसह विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले असून तिथून कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगितलं जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...