वीज बिल भरले नाही म्हणून ऑगस्ट महिन्यात शहरातील १८७३ तर जिल्ह्यातील ९१२० ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकी वाढत चालल्यामुळे महावितरण कंपनीने वसुली मोहीम तीव्र केली आहे. सुरुवातीला विद्युतपुरवठा तात्पुरता तोडण्यात येतो. त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र ग्राहकांना पुन्हा जोड घेण्यासाठी दंडासाठी थकबाकी भरावी लागणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात शहरात १ कोटी २९ लाख ५६ हजार तर जिल्ह्यात ६ कोटी ७० लाख ४४ हजार रुपये थकबाकी होती. भयापोटी एकूण १० हजार ९९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अद्यापही शहरात १४ कोटी ९९ लाख तर जिल्ह्यात ५४ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. याच्या वसुलीसाठी महावितरणने वेगवेगळी पथके तयार केली आहेत.