शासनाच्या आदेशावरून राबिण्यात आलेल्या महसूल सप्ताहामध्ये ५४ हजार १२५ जणांनी लाभ घेतला आहे. यामध्ये अडीच हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी झाले आहेत. महसूल विभागाच्या वतीने ११ तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात महसुल सप्ताहात वेगवेगळे उपक्रम राबवले.
नागरिकांची त्यामुळे विविध कामे मार्गी लागली. या अंतर्गत जिल्ह्यात ५४ हजार १२५ जणांना या सप्ताहाचा लाभ झाला. उपक्रमास नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. वाढता प्रतिसाद लक्षात घेता ही मोहिम ३० ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. सात बारा दुरुस्तीची २४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी तालुकास्तरावर ९ हजार ८३५ नागरिकांची उपस्थित होती. त्यापैकी ७९७ लाभार्थी होते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सात बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्तीचे १५५ प्रकरण हाेते. त्यापैकी २४२ प्रकरणांचे दुरूस्ती आदेश देण्यात आले.