राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकामधील गवत काढताना एका मजूराला घाम येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना देवडी, ता. मोहोळ हद्दीत घडली. मल्लिकार्जुन भीमण्णा इंचुरे (वय-55, रा. लाजा, ता. भालकी, जिल्हा बिदर) असे मृत मजुराचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मल्लिकार्जुन इंचुरे व त्याचे इतर मजूर साथीदार सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी हद्दीतील दुभाजकामधील गवत काढत होते. इंचुरे यास अचानक घाम आला व अस्वस्थ वाटू लागले. विश्रांतीसाठी म्हणून ते रस्त्याच्या कडेच्या झाडाखाली जाऊन झोपले. त्यांना त्या ठिकाणी सोडून इतर साथीदार पुढील कामासाठी गेले.