महापालिकेच्या शहर- हद्दवाढ भागात महापालिकेच्या अनेक जागा असून प्रशासनाने अशा सर्व जागांची माहिती घेऊन मोक्याच्या जागांवर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करा ही योजना राबवावी अशा सूचना माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. शहरातील विशेषता मतदार संघातील हद्दवाढ भागातील विविध नागरी समस्या, अडचणी व इतर मागण्यांच्या अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारी आमदार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले आणि संबंधित अधिकाऱ्यांसह महापालिकेत येऊन बैठक घेतली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शहर व हद्दवाढ भागांबरोबरच जुळे सोलापूर परिसरात 50 पेक्षा जास्त खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. यापैकी अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने या जागांचा उपयोग महापालिकेच्या आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करावा. यासाठी आराखडा तयार करून नियोजन करावे,असेही यावेळी सांगण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...