सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील थकबाकी घरगुती मिळकतदारांबरोबरच व्यावसायिक मिळकतदारांवरदेखील सील कारवाई संदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुदतीत संपूर्ण थकीत कर न भरल्यास त्यांच्या मिळकती सील करण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. विशेष पथकाने मंगळवारी विविध भागात कारवाई मोहीम राबविली. नोटीस मिळाल्यानंतर देखील थकीत २ लाख ३१ हजार ७८१ रुपयांचा मिळकत कर जमा न केलेल्या महाराजा फंक्शन हॉल आणि कारखाना तसेच ९३ हजार रुपयाची थकबाकी असलेल्या वसंत उर्फ नागनाथ जवाहर मोहनदास कावळदेवी यांचा कारखाना सील करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आता कारखाने सील होण्याची संख्या तीन झाली आहे. जप्ती व कर वसुली मोहिमेदरम्यान कारवाई टाळून थकीत मिळकतदार ज्ञानेश्वर चारहजारी, सोमनाथ चारहजारी, नरसिंग रंगरेज गोपाल बंकापुरे, नारायण पवार, शंकरसा भूमकर, भारतीय नागरी सहकारी पतसंस्था, सचिन अंजीखाने, सहस्त्रार्जून शाळा, फजल अब्दुल अजीज, रामस्वामी बुटला आणि धोंडीराज माने अशा १२ मिळकतदारांनी पथकाकडे ११ लाख ६४ हजार ९८६ रुपयांचा कर जमा केला. बुधवारी व्यावसायिक मिळकत दारांकडे वसुली मोहीम राबविण्यात येणार असून कर जमा न केल्यास त्या मिळकतदारांवर कारवाई करून त्यांच्या मिळकती सील आणि जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी कर भरावा असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केले आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...