मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोन्हेरी ता मोहोळ येथील एकाच वेळी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यात पाच महिला सदस्यांचा समावेश आहे. एकूण बारा सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. एका वेळी एवढ्या मोठ्या संख्येने राजीनामा देणारी कोन्हेरी ही एकमेव ग्रामपंचायत आहे.मराठ्यांना व धनगरांना आरक्षण मिळावे या साठीची दाहकता वरचेवर वाढत आहे.
केंद्र व राज्य शासनाची आरक्षण प्रश्नी भूमिका उदासीन आहे. समाज आक्रमक झाला आहे. कोन्हेरी ग्रामपंचायतीचे राजकुमार पाटील, रूपाली जरग, प्रांजली माने, मंगल शेळके, राजकुमार पांढरे, रवींद्र माने, कावेरा कौलगे, सुवर्ण शेटे यांनी आपल्या पदाचे राजीनामे ग्रामसेवक यांच्याकडे दिले आहेत. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.