सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर सोलापूर शहरातून पोलीस आयुक्तांनी एक आदेश काढत सदर जड वाहतूक सकाळी सात ते रात्री नऊ वाजे दरम्यान शहरात बंदी घालण्यात आली. त्याला व्यापारी संघटनांनी विरोध देखील केला. शहरातून दुपारी जड वाहतूक सोडावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असाही इशारा काही व्यापारी संघटनांतर्फे पोलिसांना निवेदन देऊन दिला. परंतु जड वाहतूक रात्री नऊ नंतर सुरू झाल्यानंतरही अपघाताचे बळी थांबायला तयार नाहीत.
सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन समोरील बाजूस एक वृद्ध साधु पायी स्टेशन जवळील शनी मंदिर कडे चालत जात असताना त्याला सिमेंटच्या MH13CU3545 या क्रमांकाच्या बलकर ट्रकने धक्का दिला. धक्का दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस मार लागल्यामुळे ती व्यक्ती खाली कोसळली आणि त्याच्या डोक्यावरून मागील चाक गेल्याने ती व्यक्ती जागेवरच मृत्यू पावली. मिळालेल्या माहितीनुसार सदर साधुसंत हा रेल्वे स्टेशन जवळील शनी मंदिर या ठिकाणी भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह करत होता.
जड वाहतुकीमुळे पुन्हा एकदा बळी गेला आहे. सदरील साधुसंत मूळ राहणार आंध्रप्रदेश चा आहे परंतु, अनेक वर्षांपासून तो इथेच होता आणि इथूनच भिक्षा मागून मिळणारे पैसे महिन्याला एकदा आपल्या कुटुंबाला पाठवीत होता अशी माहिती समोर आली आहे.