शहरात सुरू वारंवार असलेल्या अपघाताच्या सत्रानंतर जडवाहनां विरोधात नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला. शहरवासियांच्या आक्रमक भूमिकेनंतर जड वाहतुकीवर दिवसा बंदी घालण्यात आली. पोलीस आयुक्तांनी तसा आदेश काढून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जड वाहनाना शहरात प्रवेश द्यायचा नाही असे सूचित केले. दरम्यान या आदेशानंतर सुद्धा शहरात आलेल्या विविध जड वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून येत आहे. मालट्रक, गैस सिलेंडर ट्रक अशा विविध वाहनाना कारवाईला सामोरे जावे लागले. एकंदरीत शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...