गड्डा यात्रेत भर दिवसा एकाचा मर्डर झाला असून किरकोळ वादातून विक्रेते एकमेकांत भिडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डायात्रेमध्ये भरदिवसा एकाचा मर्डर झाल्याची घटना घडली आहे. पैशांच्या देण्याघेण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन सदरची घटना घडल्याचे प्रथमिक माहितीवरून सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाल्यानंतर घटनेचा तपास करत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू केल्याचे दिसून आले. सदर घटनेचा तपास सुरू असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यत सुरू होती.