पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन नेट झिरो दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. गेल्या 9 वर्षांत सौर क्षमता 54 पट वाढली आहे असे रेल्वेने X वर पोस्ट केले होते. मार्च 2014 पर्यंत स्थापित सौर उर्जा क्षमता 3.68 मेगावॅट होती तर 2014-23 या कालावधीत 200.31 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले, “हरित भविष्याप्रति आपल्या वचनबद्धतेत प्रशंसनीय प्रगती झाल्याचे हे दर्शवते. केवळ 9 वर्षात, आपण #MissionNetZero कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारतासाठी उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करणारा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवूया.”