अर्धापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे पक्षातील नेत्यांसह ग्रामीण शहरी भागातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन केले. तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील एका कार्यकर्त्याने तर चक्क स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून निर्णय बदलन्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी रक्ताने पत्र लिहीण्यासाठी रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे अर्धापूर शहराध्यक्ष शेख साबेर यांनी रक्त काढले. रक्ताने लिहीलेले पत्र राष्ट्रवादीचे संस्थापकीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना स्पिड पोस्टाने पाठविले होते.