पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत #HarGharTiranga मोहीम साजरी केली जात आहे.
पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे, “समाज माध्यमांवरील आपले फोटो बदलून ‘हर घर तिरंगा’ साकारूया आणि #HarGharTiranga या खास प्रयत्नाला पाठिंबा दर्शवून आपल्या लाडक्या देशाशी असलेले बंध आणखी घट्ट करूया.”