आपल्या शरीराशी निगडीत आपले स्वभावही असतात असं सांगण्यात येतं. समुद्रशास्त्रानुसार आपले स्वभाव कसे आहेत हे शरीराच्या अवयवावरून सांगण्यात येते. लग्नाआधी प्रत्येकाला स्वभाव कळत नाही. पण तुम्ही अभ्यासानुसार विचार केला तर लग्नाआधी स्वभाव जाणून घेण्यासाठी वाचा लेख
लग्न हा एक प्रकारचा जुगार आहे असं म्हटलं जातं. कारण अरेंज मॅरेजमध्ये मुलामुलींचे स्वभाव लग्नाआधी कळत नाहीत आणि लव्ह मॅरेजमध्ये स्वभाव माहीत असूनही लग्नानंतर वेगळेच अनुभव येऊ शकतात. तरीही समुद्रशास्त्रात सांगितल्यानुसार तुम्ही बोटांवरून स्वभाव ओळखू शकता. हाताची बोटं व्यक्तीचा स्वभाव दर्शवितात असं सांगण्यात येते. मुलामुलींचा स्वभाव ओळखण्यासाठी कशी बोटं असावी जाणून घ्या.
कोणत्याही मुलामुलीच्या बोटांकडे पाहून त्यांचा स्वभाव सांगता येऊ शकतो असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? लग्न करण्यासाठी स्वभाव जुळावे लागतात आणि त्यासाठी जर तुम्ही समुद्रशास्त्राचा आधार घेतला तर तुम्हाला हे ज्ञानही मिळू शकते. स्वभावासह पसंत नापसंत कशी जाणून घ्यायची नक्की वाचा
लांबसडक आणि पातळ बोटे
ज्या मुलींची वा मुलांची बोटं लांबसडक आणि पातळ आहेत त्या व्यक्ती अत्यंत क्रिएटिव्ह असतात आणि कधीही समोरच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा करत नाहीत. त्यामुळे संसार करताना या व्यक्तींची जास्त भांडणं होत नाही. गर्लफ्रेंड, पत्नी, मित्रमैत्रिण अथवा कोणतेही नाते निभाविण्यामध्ये या व्यक्ती उत्तम ठरतात. यांचे व्यक्तीमत्व आकर्षक असून सर्वांना आपलेसे करणारी ही माणसं असतात असे सांगण्यात येते.
जाडसर आणि लहान बोटं
ज्या व्यक्तींची बोटं जाडसर आणि लहान असतात त्या आपल्या आयुष्यात अत्यंत मस्त आणि खुष असतात. मनाने अत्यंत साफ असून कोणतेही कपट मनात ठेवत नाहीत. तसंच सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न या व्यक्ती करतात. मात्र अशा व्यक्ती कमी जबाबदार असतात. अंगावर कोणतीही जबाबदारी घेणं अशा व्यक्तींना आवडत नाही असं सांगण्यात येते.
जाडसर आणि भरलेली बोटं
ज्या व्यक्तींची बोटं ही जाडसर आणि भरलेली असतात अशा व्यक्ती नात्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर आणि जबाबदार असतात. मात्र अशा व्यक्तींकडे पैसा टिकत नाही आणि बचत करणे या व्यक्तींना जमत नाही आणि या व्यक्तींचा स्वभाव अधिक खर्चिक असल्याचेही दिसून येते. त्यामुळे अशी बोटं असणाऱ्या व्यक्ती मनाने जरी चांगल्या असल्या तरीही खर्चाच्या बाबतीत फारच पुढे असतात.
(वाचा – गश्मीरने अखेर सोडले मौन वडिलांशी नव्हते जवळकीचे नाते, २० वर्षांपासून वेगळे राहण्याबाबत झाला व्यक्त)
लहान आणि पातळ बोटं
लहान आणि पातळ बोटं असणाऱ्या व्यक्तींना लवकर राग येतो आणि आलेला राग लवकर शांतही होत नाही. तसंच या व्यक्ती अत्यंत कंजूसदेखील असतात. अशा व्यक्तींना कोणीही काहीही सांगितलेले पटत नाही. त्यामुळे या व्यक्तींसह संसार करणं बऱ्यापैकी कठीण ठरू शकतं. सतत नाकावर राग असल्याने पटवून घेणंही कठीण जातं.
(वाचा – तुमच्या जोडीदारात दिसत असतील या सवयी, तर Negative Personality मध्ये होतंय रूपांतर)
उंच बोटं
ज्या व्यक्तींचे मधले बोट इतर बोटांच्या तुलनेत अधिक उंच आहे त्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत इमानदार असतात. तसंच या व्यक्ती अत्यंत गंभीर स्वभावाच्या असतात आणि आपल्या नात्यात स्वतःला झोकून देतात. नात्यामध्ये अशा व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता असंही सांगण्यात येतं. अशा व्यक्ती आयुष्याकडेही फारच गंभीरपणाने पाहतात.
टीप – या लेखात देण्यात आलेल्या गोष्टी या तज्ज्ञांकडून जाणून घेतलेल्या आहेत. याचा अर्थ व्यक्ती अशाच स्वभावाच्या असतील असं नाही. तुम्ही केवळ माहितीसाठी हा लेख वाचावा.