बदलत असलेल्या वातावरणामुळे फळांचा राजा हापूस आंब्याला सुद्धा फटका बसला. कोकणात पडणारा अवकाळी पाऊस धुकं आणि सध्या असलेला ढगाळ वातावर यामुळे आंब्याचा मोहोळ काळवंडाला सुरुवात झाली आहे आणि तुडतुड्या सारख्या कीड रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय यामुळे यंदाचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरू होईल असा अंदाज आंबा उत्पादकाने व्यक्त केला फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीत सुद्धा दुपटीने वाढ झाली आहे त्यामुळे होणारा खर्च आणि उत्पादनात न मिळणारा नफा याचा ताळमेळ सुद्धा बसत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...