दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली खंडोबा देवस्थानची याञा असुन खंडोबाचे भक्त राज्यासह परराज्यातुन दर्शनसाठी दाखल होतात. अनेक भक्त दरवर्षी मनोभावे माळेगांव (याञेत) हाजरी लावुन जातात तशे याहीवर्षी हिंगनघाटचे माजी आ.राजु तिंमाडे हे निस्सिम भक्त आहेत दरवर्षी प्रमाणे माळेगाव याञेत मिञ मंडळीसह हाजरी लावली माजी आ.तिमाडेना निवासाची सोय नसल्याने माळेगांव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहातील रुमवर ताबा असतो पण यावर्षी याञेवर शासकीय राज आसल्याने रुम कुलुप बंद होते.
माजी आ.तिमाडेनी रुमच्या कुलपाची तोडमोड करुन रुममध्ये प्रवेश केला. आणी रुमचा ताबा घेऊन याञेतील विकत कुलूप घेऊन रुमला कुलुप लावले त्याची चाबी स्वतः जवळ घेऊन याञेत फेरफटाक मारण्यास गेले असता पोलिस प्रशानाने व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांनी रुमचे कुलूप तोडून रुममधील त्यांचे साहित्या बाहेर आणुन ठेवले.सर्वासमक्ष साहित्याचा पंचनामा केला
या वर्षी जि.प.निवडणुका मुदतीत न झाल्याने माळेगाव याञेचा कारभार जि.प.च्या शासकिय यंञनेवर आसल्याने बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे मानपानाचे नाट्या बंद झाले.
याञेवर प्रशासकीय राज आसल्याने लोकप्रतिनीधीचे साहित्य विश्रामगृहाच्या बाहेर फेकुन देण्याची वेळ आली आहे.पण खा.प्रताप पाटील चिखलीकरानी नेहमी याञेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे, हे कोणाला सांगावे. हिंगणघाट चे माजी आ.राजु तिमांडे यांचे विश्रामगृहाच्या रुम मधील साहित्या बाहेर फेकुन विश्राम गृहातील रुमला कुलूप लावले हि प्रक्रिया माळाकोळीचे पोलिस निरीक्षक डाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन पवार यासह खाजगी विश्रामगृहावर काम करणारे कामगार उपस्थित होते माजी आ.राजू तिमाडे यांच्या दंडेलशाही मुळे याञेतील पोलिस प्रशासनासह अधिकारी अलर्ट झाले आहेत.