सामाजिक बांधिलकी म्हणून एकत्र येत कार्य व्हावे म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महाराष्ट्र राज्यात हा उत्सव साजरा होत असताना सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने सहभागी होताना दिसतात. अनेक मंडळाचे अध्यक्ष कधी बदलतात तर काही मंडळे स्थापने पासूनच जो अध्यक्ष निवडतात त्यालाच पुढे ही धुरा सांभाळायला देतात. आता हा अध्यक्ष इतर जातीधर्माचा असला तरी त्याला आपल्यालाच आहे असं समजून गुण्यागोविंदाने उत्सव साजरा करतात. डोंबिवलीतील एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपद मुस्लिम समाजातील एका माणसाकडे आहे. डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील शिवशंकर नगर मित्र मंडळ गेली 18 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळाचा अध्यक्ष आहे राजू शेख. शेख हे मंडळातील कार्यकर्त्यासोबत गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पासून ते गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करेपर्यत कार्यरत असतात. एवढेच नव्हे तर आरतीही करतात. शेख यांच्या बरोबर परिसरातील इतर मुस्लिम समाजातील बांधवही गणरायाची भक्तिभावाने पूजा करतात. सामाजिक सलोखा व जगात सुख व शांती असावी असे श्री गणेशाकडे प्रार्थना करत असल्याचे शेख म्हणतात.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...