छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणातला असे वक्तव्य बहजप नेते प्रसाद लाड यांनी केल्यावर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. पण आता खुद्द संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ चुकवलंय. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
खरंतर बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं सांगितलंय. सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘लो कर लो बात… सर्वज्ञानी संजय राऊतजी म्हणताहेतबाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला… अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे, तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. ‘संजय राऊतांचं अज्ञान यातून प्रकट होतंय. संजय राऊत ज्या ठाकरे गटाचं प्रतिनिधीत्व करतात, त्यांचं आंबेडकरांवर कधी प्रेम होतं? संजय राऊत कंपाऊडरकडूनच औषध घेतात, हे आता लोकांना लक्षात येईल. कुठलाही ससंकृत माणूस आपली चूक दुरुस्त करेल आणि माफी मागेल, पण संजय राऊतांकडून अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण ते मीडियाशी बोलताना शिव्या देतात आणि मग नैतिकतेचे धडे शिकवतात. लोका शिकवे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाशाण, अशी संजय राऊतांची स्थिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याच्या योग्यतेचे राहिलेत, असं वाटत नाही,’ अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
लो कर लो बात…
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी म्हणताहेत
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला …अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे
तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान@BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/tTjb5GFjyW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022