निजामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडल येथे राष्ट्रीय महामार्ग 44 वर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. हैदराबादहून नागपूरकडे निघालेली कार भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला आणि त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत हे महाराष्ट्रातील बिलोली येथील रहिवासी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...