अहमदनगरच्या क्रांती नाईक. 100 दिवसांत क्रांती नाईक यांनी ज्ञानेश्वरी उलट्या अक्षरात म्हणजे लिओ ग्राफी अक्षरात लिहून पूर्ण केली आहे. जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया बुकमध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली. सौ. क्रांती नाईक या आर्मी स्कूलमध्ये अध्यापिका होत्या. आपला हा अनोखा छंद जोपासताना अगोदर त्या उलट्या अक्षरात हाताला लागेल ते साहित्य लिहीत होत्या. पण मग त्यांनी यात आणखी काही मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिओ ग्राफीमध्ये लिहिण्याचं ठरवलं.
सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेपासून ज्ञानेश्वरी उलट्या अक्षरात लिहिण्यासाठी घेतली आणि अवघ्या १०० दिवसात संपूर्ण ग्रंथ लिहून पूर्ण केला. हा एक विक्रम आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आणि अशा प्रकारे कुणीच संपूर्ण ज्ञानेश्वरी उलट्या अक्षरात लिहिण्याचा विक्रम केलेला नाही हे समजल्यानंतर त्यांनी जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया बुकशी संपर्क केला. क्रांती नाईक यांच्या विक्रमाला मान्यताही देण्यात आली. क्रांती यांना याबद्दलचे प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.