या वर्षीचा फेमिना मिस इंडिया 2023 चा ताज नंदिनी गुप्ताने पटकावला. 19 वर्षीय नंदिनी या विजेतेपदासह 59 वी मिस इंडिया बनली आहे. राजस्थानच्या कोटा शहरातील या मुलीने 29 स्पर्धकांना मागे टाकत फेमिना मिस इंडियाचा मुकुट जिंकला आहे. नंदिनीचा आत्मविश्वास आणि तिचे सौंदर्य आणि मोहकतेची भूरळ सर्वांनाच पडली. नंदिनी आज अनेक जाणांची प्रेरणाबनली आहे. मिस इंडियाच्या फायनल राउंडमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला यावेळी नंदिनीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे मन जिंकून घेतले.
या स्पर्धात नंदिनी गुप्ताने फॅशन डिझायनर रॉकी स्टारने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. रॉकीने या स्पर्धेत उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांचे गाऊन डिझाईन केले होते. या सुंदर ड्रेसमध्ये ती एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत आहे.
नंदिनी एका मुलाखतीत सांगितले की ती सर रतन टाटा यांनी आदर्श मानते. ते त्यांच्या कमाईमधील बहुतांश भाग दानधर्मासाठी देतात. त्याचबरोबर ती प्रियांका चोप्राला ती आपला आदर्श मानते. मिस इंडियाचा ताज जिंकण्यासाठी नंदिनी लहानपणापासूनच हे स्वप्न पाहत आहे. ती म्हणाली, ‘मी 10 वर्षांची असल्यापासून मला फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घ्यायचा होता. माझं ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे.
नंदिनीच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर गेले अनेक वर्ष या स्पर्धेची तयार करत असल्याचे लक्षात येते. तिने फॅशनसोबतच तिच्या फिटनेसवरही मेहनत घेतली आहे. नंदिनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.