कोणाचं नशीब कसं बदलेलं हे काही सांगता येत नाही. एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं आहे. रात्रभरात ती कोट्यवधींची मालकीण झाली आहे. तिने ३०० कोटींहून अधिकची रक्कम जिंकली आहे. तिने हे पैसे जिंकले यावर त्या महिलेचा विश्वासच बसत नाहीये. आता ती नोकरीचा राजीनामा देणार असून आनंदात आयुष्य जगण्याता विचार करत आहे.
ऑस्ट्रेलियातील इचुका येथील ही घटना आहे. पॉवरबॉल लॉटरीत या महिलेने ४० दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ३२७ कोटींहून अधिकची रक्कम जिंकली आहे. तिने ऑनलाइन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते, यामध्ये तिला मोठे बक्षीस मिळाले. या वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी असल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा तिला याबाबत सांगण्यात आलं तेव्हा तिला वाटलं की कुणीतरी तिची फसवणूक करत आहे.
पैसे जिंकल्याचं कळताच महिलेला धक्का बसला
या महिलेला वाटलं की कोणीतरी तिची फसवणूक करत आहे. पण, मग जेव्हा तिला याबाबत खरं ते कळालं तेव्हा तिला धक्काच बसला. तिचा यावर विश्वासच बसेना की तिने इतके पैसे जिंकले आहेत. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कळेना काय करावं.
रात्रभर नवरा-बायकोला झोपच लागली नाही
तिला ही बातमी मिळाली तेव्हा ती ऑफिसमध्ये होती. घरी आल्यानंतर ती आणि तिचा नवरा रात्रभर झोपू शकले नाहीत. ते रात्रभर घरातल्या घरात फेऱ्या मारत होते. अद्याप त्यांच्या खात्यात पैसे यायचे आहेत. एकदा पैसे मिळाले की काळजी करण्याची गरज राहणार नाही. त्या दोघांनाही नोकरीही करावी लागणार नाही. सध्या ती नोकरी सोडून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा विचार करत आहे.
वाढदिवसाला लॉटरीचं तिकीट खरेदी केलं अन् अब्जो रुपये जिंकले
काहीच दिवसांपूर्वी एका १८ वर्षांच्या मुलीने ३ अब्ज रुपये जिंकले होते. तिने तिच्या वाढदिवशी आजोबांच्या सल्ल्याने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. ते तिने खरेदी केलेलं पहिलं लॉटरीचं तिकीट होतं. त्यातून ती इतक्या लहान वयात श्रीमंत झाली. त्यामुळे सर्वात कमी वयात इतकी मोठी लॉटरी जिंकण्याचा विक्रमही तिने तिच्या नावावर केला आहे.