केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देशातील प्रमुख ठिकाणी १५७ नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात येणार आहे. २०१४ पासून देशभरात ५७ मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली असल्याचं त्या म्हणाल्या. सीतारामन यांनी लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी नॅशनल डिजीटल लायब्ररीची स्थापना करण्यात येणार आहे. देशात आगामी तीन वर्षात शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, कौशल्य विकास यासंदर्भात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
सीतारामन यांनी नॅशनल डिजीटल लाइब्ररीमध्ये भूगोल, साहित्य आणि सर्व विषयांची पुस्तके असतील अशी माहिती दिली. नॅशनल बुक ट्रस्ट आणि चिल्ड्रन बुक ट्रस्ट मुलांची पुस्तक वाचनाची आवड वाढवण्यासाठी मदत करतील. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओची मदत घेतली जाणार असल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या, देशभरात आगामी तीन वर्षांमध्ये केंद्रीय संस्थांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. केंद्र सरकार ३८ ८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ७४० एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करणार आहेत. या शाळातून साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये भारताचं स्थान भक्कम करण्यासाठी देशात तीन सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवली जाणार आहेत. एआयच्या क्षेत्रात देशातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. आधुनिक युगात भारताला मागं राहून चालणार नाही, असंही सीतारामन म्हणाल्या.
देशात पंतप्रधान कौशल्य विकास योजना ४.० सुरु करण्यात येणार आहे. युवकांना आंतरराष्ट्रीय संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून ३० स्किल इंडिया नॅशनल सेक्टर्सची उभारणी केली जाणार आहेत.