इगतपुरी तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा म्हैसवळण घाटात रविवार सकाळी दुपारच्या सुमारास विश्राम गडावरून टाकेद नाशिकच्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक सहल MH 15 AK 1632 क्रमांकाच्या बसचा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर सदर परिसरातील नागरिकांकडून घटनास्थळावर मदत कार्य करण्यात आले. रुग्णवाहिका बोलावून एसएमबीटी रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इस्कॉन मंदिर संस्थेतर्फे जवळपास चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर आले होते. त्यानंतर ते विश्रामगडाला (पट्टाकिल्ला) भेट देऊन येत असताना परतीच्या प्रवासात नाशिक नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबा जवळ गाडीचे ब्रेक फेल झाला. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूने असलेल्या डोंगराच्या कडेला गाडी घसरवली यावेळी डोंगराच्या बाजूला गाडी पलटी झाल्यानंतर दहा विद्यार्थी जखमी झाले तर चार जण खंबीर जखमी झाले.
जखमींनीसह सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर एस एम बी टी रुग्णालयातील कार्डेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार चालू केले.
शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल ची ही बस असून यात इस्कॉन मंदिर संस्थेचे चाळीस विद्यार्थी होते.चालकाच्या प्रसंगावधनतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.पोलीस प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले पाहणी करून क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला सारत परस्थिती नियंत्रनात आणली नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. आज पुन्हा एका बस ला अपघात झाला असून सहलीसाठी आलेले बसमधील विद्यार्थी जखमी झाले आहेत.