राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भव्य पुतळा तयार झाला आहे. २० फूट उंच व १५ फूट रूंद असा ५ टन वजनाचा हा भव्य पुतळा आहे. मी पालकमंत्री असतांना डीपीडीसीच्या बैठकीत या पुतळ्याच्या निर्मितीला मंजूरी देऊन निधीही मंजूर केला होता. कोव्हिडमुळं पुतळा तयार होण्यास थोडा विलंब झालाय. टाकाऊ पोलादी वस्तूंपासून हा पुतळा जेजे स्कूल ऑफ आर्टस च्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हा पुतळा तयार केला आहे. लवकरच हा पुतळा कायमस्वरूपी बसविण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांचाही भव्य पुतळा निर्मितीसाठीही निधी मंजूर झालेला आहे, लवकरच त्या पुतळ्याचंही काम सुरू होईल. सकारात्मकता ठेवल्यास सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात, हे यानिमित्तानं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...