सोयगाव / संभाजीनगर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा ता.सोयगाव येथे मित्रांच्या मदतीसाठी येणारे दानशूर शिक्षक राजेंद्र सपकाळे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज व संवाद साधला.शिक्षक राजेंद्र सपकाळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पळसखेडा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी ११,१११ रुपये अशी मदत देणगी दिली.
केवळ शिक्षक नव्हेत,तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक,समाजासाठी आदर्श आणि उदार मनाचे प्रतीक आहेत.सपकाळ यांनी देणगी भावना ही सदैव समाजकेंद्री,नि:स्वार्थ आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित असते.त्यांनी दिलेला प्रत्येक हातभार हा त्यांच्या विशाल हृदयाचा,मनातील करुणेचा आणि समाजासाठीच्या बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे.त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे शाळेतील क्रीडा विभाग अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार बळकट करण्यास मोठी मदत होईल.या प्रसंगी आदर्श शिक्षक व शिक्षक सेना तालुका अध्यक्ष रवींद्र शेळके विशेष उपस्थित होते.
दोन्ही मान्यवरांचे शाळेत आगमन होताच मनमोहक स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या उदार देणगीमुळे शाळेतील क्रीडा विभागाला मोठी चालना मिळणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार अधिक बळकट होणार आहेत.सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शाळा प्रांगण उत्साहाने भरून गेले.
शाळेच्या विकासातील त्यांच्या योगदानाची दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक अनिल ठाकूर,शिक्षक अर्जुन पारधे यांच्या हस्ते श्रीफळ,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार शाळेतील शिक्षकवृंद वासुदेव कोळी, प्रमोद अवधूत,दिपक कोष्टी,लक्ष्मण सोनवणे,संजय लाठे, अमित जाधव,रिजवान शेख,सचिन कासार यांनी मानले.
सोबत फोटो –

























