सोलापूर – काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावर सातलिंग शटगार यांची निवड झाल्यानंतर नव्या कार्यकारणीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. नव्या कार्यकारणी मध्ये कोणाला संधी देणार, कोणाला डावलले जाणार आहे. याची उत्सुकता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी शुक्रवार दि.१७ ऑक्टोंबर रोजी ऐन दिवाळीत जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. या जम्बो कार्यकारणीमध्ये तब्बल ११९ जणांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, या कार्यकारणीत वरिष्ठ उपाध्यक्ष ९, उपाध्यक्ष २५, समन्वयक १, खजिनदार १, संघटक १, प्रसिद्धी प्रमुख १, सरचिटणीस २३, चिटणीस २५, कार्यकारणी सदस्य १३, अशी १०० जणांची कार्यकारणी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. यांसह ब्लॉक अध्यक्ष १२, आणि शहराध्यक्ष ७ यांची ही निवड करण्यात आली आहे. असे एकूण ११९ सदस्यांची कार्यकारणी नावानिशी जाहीर करण्यात आली असून, सर्व समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या मंदी संधी देण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांनी कार्यरत रहावे असे आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले आहे.