जालना – भारतीय कामगार सेना व महिको कंपनीच्या गोकुळवाडी, मांडवा, घाणेवाडी, डेअरी, जालना, दावलवाडी, हातवण, पिंपळगाव, बोरखेडी, सिंधीकाळेगाव आदी फॉर्मवर काम करणार्या मुनिम, ड्रायव्हर, सालदार, महिनदार आदी कामगारांच्या वतीने ११ वा ऐतिहासिक मासिक पगार वाढीचा करार आज करण्यात आला. कामगारांनी फटाके फोडून, गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून कराराचे स्वागत केले आहे.
करारानुसार कामगारांना वर्षातून दोन युनिफॉर्म सिलाईसह, शुज, रेणकोट, स्वेटर, बारा महिन्यात ३६ सुट्या, घर बांधणीसाठी कर्ज, दिवाळी करिता १५ हजार रुपये अॅडव्हांस, २० टक्के बोनस, ग्रज्युटी, अत्यावश्यक कामाकारिता एमर्जन्सी लोन, यासह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ या करारामुळे कामगारांना मिळणार आहे.
करार करण्यासाठी महिको कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष अजय वैद्य, सलिल भिडे, महेंद्र चव्हाण, दिपक दरक, विनय नखाते, राजेंद्र बनकर तर भारतीय कामगार सेनेच्या वतीने विभागीय संयुक्त चिटणीस प्रभाकर मते, जिल्हाध्यक्ष जनार्धन रेगुडे, युनिटचे पदाधिकारी मदन म्हस्के, दादाराव कावले, विठ्ठल चंद, महेबुबखाँ पठाण आदी उपस्थित होते.
४- भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक
करार झाला असून कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ
झाल्याचा करार करण्यात आला.

























