या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी व ग्रंथपाल श्री. अनंत दिवाणजी यांच्या हस्ते आद्यग्रंथपाल श्री शियाली राममृत रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी मा. सौ. श्रुती बागेवाडी विद्यार्थ्यांशी कथेच्या माध्यमातून संवाद साधला. शाळेने घेतलेल्या वाचकवीर स्पर्धेतील बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी चि. समर्थ डोंगरे याने शालेय ग्रंथालयाचे महत्त्व व डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांचा थोडक्यात परिचय करून दिला.
सदर कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका मा. सौ. सुस्मिता तडकासे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सौ. दीप्ती इंगळे तर आभार प्रदर्शन शाळेचे सहशिक्षक श्री. निलेश व्यवहारे यांनी केले.