अक्कलकोट – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात आयोजित पालक – शिक्षक मेळाव्यात राष्ट्रीय छात्र सेना मधील सुमारे १२ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, एनसीसी चे प्रशिक्षण अधिकारी नायब सुभेदार, महेश बरगंडे, हवालदार मच्छिंद्र गिरी, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, उपप्राचार्य प्रा. व्ही. एन. वैद्य, पर्यवेक्षक प्रा. एन. एस. भरमशेट्टी, पालक प्रतिनिधी सत्यपा गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषण पालक शिक्षक संघटनेचे समन्वयक डॉ. किशोर थोरे यांनी केले. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या समर्थ म्हेत्रे, मारुती गायकवाड, गौसपाक बिराजदार, खंडप्पा बिराजदार, केदार पुजारी, महांतेश पाटील, राहुल काळे, आर्यन पटेल, दर्शन गायकवाड, सिद्धाराम कोळी, माळाप्पा जंबगी व नागेश बाळीकाई या यशस्वी १२ विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान खेडगी व भिताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात बसलिंगप्पा खेडगी बोलतांना म्हणाले, तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना पुणे- मुंबई सारख्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी तत्पर असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करून महाविद्यालयाचे व तालुक्याचे नाव महाराष्ट्रामध्ये आणि देशात उज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मारुती गायकवाड आणि दर्शन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. एनसीसी चे प्रमुख कॅप्टन डॉ. बी. एन.कोणदे यांनी एन.सी.सी. विभागाच्या आजपर्यंतची वाटचाल व यशस्वी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक व एन. सी. सी. विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. सी. सी. चे प्रमुख कॅप्टन डॉ. कोणदे व पालक-शिक्षक समितीचे समन्वयक डॉ. किशोर थोरे, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डॉ. लता हिंडोळे यांनी तर आभार डॉ. सी.डी. अणेकर यांनी मानले.
देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर आपला आयुष्यातील अनेक आठवणी व प्रसंगाच्या आधाराने आपणही यश मिळवू शकता.आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान महत्त्वाच असते. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते.
_ दीपक भिताडे पोलीस निरीक्षक
उत्तर पोलिस स्टेशन अक्कलकोट


























