टेंभुर्णी – माढा तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 118 गावांमधील बाधित शेतकऱ्यांना जवळपास 131.75 कोटी रुपये वितरित होणार अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी टेंभुर्णी श्री संजय पाटील यांनी दिली
यावर्षी माढा तालुक्यातील सर्व मंडळ मध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिना कार्डच्या गावात पुराच्या पाण्याने अक्षरशा थैमान घातला गेला त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे शेती पिकांचं व इतर मालमत्तेचे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तालुक्यातील जवळपास 118 गावातील सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय समितीने करून जवळपास 98 हजार 328 शेतकरी संख्या यांचे 81 हजार 073 हेक्टर बाधित क्षेत्राची पंचनामे करून 131.75 कोटी नुकसानीचा पंचनामे करून शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करून त्या शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन अपलोड करण्यात आलेले आहेत व त्या पंचनामाच्या आधारे तालुक्यातील 118 गावातील 98 हजार 328 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे जवळपास 131.75 कोटी निधी वितरण सुरुवात झालेली आहे.
दिवाळी व सुट्टीच्या दिवसांची सुट्टी न घेता प्रशासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास प्रशासनाने अहोरात्र पंचनामे करून शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करून अपलोड केल्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने पात्र शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला