पूर्णा / परभणी – पूर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक साठी आता उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक साठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर २३ नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी ११२ उमेदवारी उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे सर्व ठिकाणी चुरशीच्या व चौरंगी पंचरंगी लढती होणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ शुक्रवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता.नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत तर २३ नगरसेवकाच्या निवडीसाठी एकूण ११२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत त्यामुळे सर्वच प्रभागात चौरंगी पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे तर अध्यक्ष पदासाठी तब्बल १४ उमेदवार निवडनुकीच्या रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे या निवडणुका अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या होणार आहेत.
शुक्रवारी काही जणांनी आपले उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या उपस्थित परत घेतले आहेत आता अर्ज घेण्याची प्रक्रिया संपल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत तर२३ नगरसेवकाच्या निवडीसाठी ११२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत.


















