कारवाई न करण्यासाठी 15 हजाराची लाच मागणाऱ्या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक विरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी झाली. पोलीस नाईक दत्तात्रय रामचंद्र कांबळे (बक्कल नं.1318, नेमणुक सलगरवस्ती पोलीस ठाणे सोलापूर) असे लाचखोर पोलीसाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकामासाठी लागणारी वाळू घरासमोर ठेवलेली असताना ती वाळू चोरीची आहे असे पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे यांनी सांगून तुमच्या विरूध्द गुन्हा दाखल करतो असे म्हणून तक्रारदाराच्या भावाला सलगरवस्ती पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर प्रकरण मिटवायचे असेल तर 20 हजार रूपये द्यावे लागेल अशी लाचेची मागणी केली त्यावरून 15 हजाराची तडजोड झाली अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होताच त्या तक्रारीची खात्री केल्यानंतर यामध्ये पोलीस नाईक कांबळे हे दोषी आढळून आल्याने त्यांच्या विरूध्द सलगरवस्ती पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक अमोल तांबे, अप्पर अधिक्षक डॉ.शीतल जानवे खराडे, सोलापूरचे उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, संतोष नरोटे, राहुल गायकवाड यांनी यशस्वीपणे पार पाडली.