प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या) होणार आहेत. 01053 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३एप्रिल ते २६ जून दर बुधवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल. 01054 साप्ताहिक विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जून दरम्यान दर गुरुवारी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, जेनाथपूर आणि वाराणसी असे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणीचा एक , वातानुकूलित- द्वितीयचे दोन, वातानुकूलित-तृतीयचे ६ तर शयनयानचे ८, सेकंड सीटिंग चेअर कार ३ आणि गार्डची ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारचा प्रत्येकी एक डबा असेल.
यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिहारच्या दानापूरदरम्यान आठवड्यातून २ फेऱ्या असतील. ०१४०९ द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ एप्रिल ते २९ जून दर सोमवार आणि शनिवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. 01410 द्वि-साप्ताहिक विशेष दानापूर २ एप्रिल ते ३० जून दरम्यान दर मंगळवार आणि रविवारी १८.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीमध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणीचा एक , वातानुकूलित- द्वितीयचे दोन, वातानुकूलित-तृतीयचे ६ तर शयनयानचे ८, सेकंड सीटिंग चेअर कार ३ आणि गार्डची ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारचा प्रत्येकी एक डबा असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर दरम्यान ४ एप्रिल ते २७ जून या काळात विशेष साप्ताहिक गाडी (गाडी क्र 01043) सुरू करण्यात येईल. ही गाडी दर गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.१५ वाजता समस्तीपूर येथे पोहोचेल. तर समस्तीपूर येथून 01044 साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २८ जून या काळात सुटतील ही गाडी दर शुक्रवारी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि रविवारी ७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर. असे थांबे देण्यात आले आहेत. तर गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणीचा एक , वातानुकूलित- द्वितीयचे दोन, वातानुकूलित-तृतीयचे ६ तर शयनयानचे ८, सेकंड सीटिंग चेअर कार ३ आणि गार्डची ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारचा प्रत्येकी एक डबा असेल.
यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल ते २ जुलै या काळात दर मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रयागराज येथे पोहचेल. तर वातानुकूलित साप्ताहिक विशेष प्रयागराज येथून १० एप्रिल ते ३ जुलै दरम्यान बुधवारी संध्याकाळी ६.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, तीन वातानुकूलित- द्वितीय, १५ वातानुकूलित- तृतीय, १ हॉट बुफे कार आणि १ जनरेटर कार अशी डब्यांची व्यवस्था आहे.
यासोबतच टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष असतील. 01123 ही साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ एप्रिल ते २८ जून या काळात चालवली जाईल. ही गाडी दर शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.५५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. तर गोरखपूर येथून ६ एप्रिल ते २९ जून या काळात ही 01124 साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ दुसरी सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी डब्यांची सरचना असेल.
आरक्षण : उन्हाळी विशेष ट्रेन क्रमांक 01053, 01409, 01403, 01045 आणि 01123 साठी विशेष शुल्कासाठी बुकिंग दि. ३०.०३.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलेय.