सोलापूर – सोलापूर जिल्हा्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचे अनुषंगाने जिल्हा समन्वय समिती सभा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित केल्यानंतर जर कुष्ठरोग आढळून आला तर त्याला तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
मार्गदर्शक सुचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील 3657590 लोकसंख्या प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडली आहे. तपासणी करण्यासाठी 2768 स्त्री व पुरुष असलेली पथके निर्माण केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येकाची शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेतील. या संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करण्यात येणार आहे. जर कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आली व कुष्ठरोगाचे निदान निश्चित करण्यात आले तर तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे.
आपल्या घरी येणारे पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करावे.
सदर अभियान नियोजनबद्ध राबवून यशस्वी करण्याचे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
लक्षात असू द्या –
सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी सांसर्गिक रोग आहे.
नियमित, योग्य व पुरेशा औषधोपचाराने कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.
कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.
कुष्ठरोगाचे मोफत निदान व उपचार सर्व शासकीय निमशासकीय रुग्णालयात दररोज होते.
कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नंदकुमार घाडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ . अभिवंत, डॉ. वाळवेकर, मनपा.सोलापूर, कुष्ठरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे व डॉ. सुनंदा राऊतराव, सर्व तालुका अधिकारी, सर्व जिल्हा कोआँर्डिनेटर्स राष्ट्रीय आरोग्य अभियान


















