Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

1977 साली फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत होते : शरद पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2023
in maharashtra
0
1977 साली फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत होते : शरद पवार
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात,” असं शरद पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. “1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात,” असं शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोबतच राष्ट्रवादीमधील बदलांबाबतही भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात भाष्य

देवेंद्र फडणवीस म्हणतात एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी आणि पवारसाहेबांनी केली तरी मुत्सद्देगिरी? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, “कधी केली पवारांनी? कधी केली हे त्यांनी सांगावं. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. ते लहान होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात, यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही.

फडणवीस काय म्हणाले होते?

चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत 1977 च्या घडामोडींचा संदर्भ दिला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली त्यांनी स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. “शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.

मॅच्युअर पॉलिटिक्सची कमतरता

बिहारच्या पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीक करण्यात येत आहे. 19 पंतप्रधान एकत्र आले होते, असा टोला भाजपने लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारची भाष्य करणं पोरकटपणा आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा देखील झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तेढ या मुद्द्यांवर चर्चा झाली, असं पवारांनी सांगितलं. तसंच लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? असा सवालही शरद पवार यांनी विचारला आहे. पवार म्हणाले की, “गेले दोन दिवस अनेक तथाकथित नेते हे लोक जमले का, त्यांनी बैठक का घेतली, लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? भाजप प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य आलं की बैठकांची गरज का होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं वक्तव्य आलं की मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. तुम्हाला बैठक घेता येतात पण इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते. माझ्या मते मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात त्याची कमतरता यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही.”

‘हे फडणवीस यांचं अज्ञान’

राष्ट्रवादीत ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, त्यांना कोणत्या पदावर संधी दिली जात नाही, असं देवेंद फडणवीस म्हणाले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पुन्हा एकदा सांगतो हे फडणवीस यांचं अज्ञान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष होते छगन भुजबळ. ते कोण आहेत?  त्यानंतर अध्यक्षपदावर पिचड होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे. ही सगळी यादी जर दिली अर्थात त्यांचं वाचन किती आहे याची मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता वक्तव्य करतात. लोकांना माहित असतं. लोकांना हाही अनुभव आहे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरुन नाही.

अजितदादांची जबाबदारी बदलणार का, पवार म्हणतात…

आपल्याला दुसरी जबाबदारी द्यावी असं अजितपवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं होतं. आता अजितदादांची जबाबदारी बदलणार का आणि बदलली तर कोणती जबाबदारी देणार या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “हा निर्णय एकटा घेत नसतो. त्यांच्यासह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधी निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी  भावना आहे. तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यापेक्षा जास्त काही नाही.”

Post Views: 71
Previous Post

पुढील 48 तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे…

Next Post

डंके की चोट पे! गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांच्या पॅनलला धक्का, विजयानंतर झळकले नथुराम गोडसेचे बॅनर्स

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
डंके की चोट पे! गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांच्या पॅनलला धक्का, विजयानंतर झळकले नथुराम गोडसेचे बॅनर्स

डंके की चोट पे! गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांच्या पॅनलला धक्का, विजयानंतर झळकले नथुराम गोडसेचे बॅनर्स

ताज्या बातम्या

वाईट सापळा;मारायचे होते सासूला पण पतीच गेला… #public #marathinews #viral #solapurnews #aajsolapur

February 23, 2026

क्या बात है कॅमेऱ्याद्वारे केली पाण्याची तपासणी… #public #marathinews #solapurnews #viral

February 23, 2026

कौतुकाची थाप प्रगतीसाठी प्रेरणादायी : काळे

February 23, 2026

राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धेसाठी तेजश्री राजगिरे हिची निवड

February 23, 2026

सेंट्रल बँके तर्फे कृषी कर्ज जनजागृती शिबीर संपन्न

February 23, 2026

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन

February 23, 2026

शिवजयंती निमित्त थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील मंडळाकडून सरबत वाटप

February 23, 2026

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

February 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0697887

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697