मंगळवेढा – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामाकरिता दि।१/११/२०२५ ते दि।१५/११/२०२५ तसेच दि।१६/११/२०२५ ते दि।३०/११/२०२५ या दोंन्ही पंधरवाडयात ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना प्रति मे.टन रु.२८००/- प्रमाणे पहिला हप्ता संबंधीत शेतकरी यांचे मागणीनुसार त्या त्या बँका/पतसंस्था यांचेकडे वर्ग केला आहे. तसेच उर्वरित रक्कम रुपये २०० प्रमाणे ऊसबिल दिपावली सणाकरिता देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, या हंगामाकरिता जुन, जुलै, ऑ गस्ट,सप्टेंबर या महिन्यात मोठया प्रमाणात पाऊस झालेने व वातावरण पोषक असलेने ऊसाची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली असून ऊस उत्पादकांना एकरी चांगले टनेजही मिळत आहे.कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन कस्र्न ऊस उत्पादक शेतक-यांच्या विश्वासाला पात्र राहणेसाठी संचालक मंडळाने रु.२८००/- प्रमाणे ऊसबील देणेचा निर्णय घेतला आहे तरी शेती विभागाच्या कर्मचार्यांकडून बीलाचे व्हावचर घेवुन आपले संबंधीत बँकेतुन ऊसाचे बीलाची रक्कम घ्यावी असे त्यांनी सांगीतले. दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा विश्वास असलेने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालू आहे. कार्यक्षेत त्रातील सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखान्याचा हंगाम चालु राहणार असुन शेतक-यांनी ऊस गळीतास पाठविण्याची घाई न करता तोडणी वाहतुक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केंले आहे.
ऊस उत्पादकांची ऊस बिले संबंधीत शेतकऱ्यांचे खालील प्रमाणे बँकेतील खातेवर वर्ग केली असलेची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
धनश्री पतसंस्था मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ब्र्म्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, शेलेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, लक्ष्मी दहिवडी, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी,गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, सिध्दनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु। तसेच महाराष्ट्र गेटकेन मधील पंढरपूर, जत, मोहोळ, द.सोलापूर, उ.सोलापूर व संपुर्ण कर्नाटक गेटकेन, जिजामाता पतसंस्था,मंगळवेढा – मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला, रतनचंद शहा बँक,मंगळवेढा-सांगोला गेटकेन, धनलक्ष्मी पतसंस्था, अरळी- अरळी,नंदुर,दसुर,उंब्रज।, लक्ष्मी पतसंस्था अरळी- बँकेचे मागणी पत्रानुसार,।भैरवनाथ पतसंस्था, कंदलगाव – कंदलगाव, अकोला, मंद्रूप, ज्ञानेश्वरी को।क्रे।सोसायटी, मंगळवेढा बँकेचे मागणी पत्रानुसार, शंभु महादेवा मल्टीस्टेट को।आùप क्र।सोसा।लि। लोणार – लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु।, तसेच शेतक-यांचे मागणीप्रमाणे वैयक्तिक चेक देण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय बळीराजा व धनश्री पतसंस्था येथे दि।१/११/२०२५ ते दि।१५/११/२०२५ तसेच दि।१६/११/२०२५ ते दि।३०/११/२०२५ या दोंन्ही पंधरवाडयाची तोडणी वाहतुक बिले ठेकेदारांचे मागणीप्रमाणे पाठविण्यात येत आहेत.
सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात म्हणाले कि, चालु हंगामात दामाजी कारखान्याने आजअखेर एकूण ५४ दिवसात १,५५,०२० मे.टन गाळप केले असून एकूण १,३९,४०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे.आजचा साखर उतारा १०.२४% असुन आजअखेर साखर उतारा ९.०४% मिळाला आहे. चालु हंगामात गळीतास येत असलेला जास्तीत जास्त ऊस हा ०२६५ जातीचा आहे. आपले सवांर्चे सहकार्यातून शेतक-यांची ऊस बिले, कामगार पगार, तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे काम हे संचालक मंडळ करीत असलेचे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्रथमेश पाटील, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार मोठया संख्येने उपस्थित होते.


























